देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य ते कलाकार सध्या घरातच आहेत. अभिनेत्री पल्लवी पाटील हिने चेहऱ्यावर मास्क लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना पल्लवी म्हणतेय, मला आशा आहे तुम्ही सगळे सुरक्षित आहात. तुम्ही तुमच्या कुटुबांची आणि स्वत:ची काळजी घेता आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावायचा विसरु नका. अशा आशयाचे कॅप्शन पल्लवीने या फोटोला दिले आहे.
लॉकडाऊनमध्ये चेहऱ्यावर मास्क लावत मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:02 IST