Join us

​ही मराठी अभिनेत्री बनली लेखिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 10:56 IST

छोट्या पडद्यावरील खुळता कळी खुलेना ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील मानसी, विक्रांत या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी ...

छोट्या पडद्यावरील खुळता कळी खुलेना ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील मानसी, विक्रांत या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका संपून कित्येक महिने झाले असले तरी आजही या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेतील लोकप्रिय कलाकार आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखने मानसी ही भूमिका साकारली होती. मयुरीने साकारलेली मानसी रसिकांची लाडकी बनली होती. या मालिकेतील मानसीचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. या मालिकेत सरळ साध्या स्वभावाची असणाऱ्या मानसीचा मालिकेतील लूक तितकाच सिम्पल असा होता. ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी मानसी काय करतेय हा प्रेक्षकांना प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.मयुरीच्या अभिनयावर रसिक चांगलेच फिदा आहेत. पण आता अभिनयासोबतच आणि एक क्षेत्रात तिने भाग्य आजमावायचे ठरवले आहे. मयुरी आता एक लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने एका नाटकाचे लेखन केले असून हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिअरआजो असे या नाटकाचे नाव असून या नाटकाचे लेखन मयुरीने केले आहे. मयुरी तिच्या या नव्या इनिंगबाबत खूपच उत्सुक आहे. या नाटकाचे लेखन करण्यासोबतच या नाटकात मयुरी काम देखील करणार आहे. या नाटकाची निर्मिती थ्री जेन प्रोडक्शनसने केली आहे. मयुरीचे हे नवे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. मयुरीनेच फेसबुक या सोशल नेटवर्किग साईटच्या माध्यमातून ही बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. तिने फेसबुकवर तिचा एक फोटो शेअर करून त्यासोबत दिअरआजो या नाटकाचे लेखन तिने केले असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तिची ही पोस्ट वाचून तिचे फॅन्स प्रचंड खूश झाले असून अनेकांनी या तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिला तिच्या या नाटकासाठी तिच्या फॅन्सनी शुभेच्छा दिल्या असून आम्ही या नाटकाची आतुरतेने वाट पाहात आहोत असे प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे. Also Read : खुलता कळी खुलेनाचे विक्रांत आणि मानसीची पुन्हा झाली भेट