Join us

पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमातून सुबोध भावे आणि श्रुती मराठी झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:14 IST

कौटुंबिक, नातेसंबंध आणि लग्न सोहळ्याची धम्माल असणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले.रसिकांना या सिनेमांमधील फॅमिली ड्रामा चांगलाच भावला.त्यामुळेच राजश्री ...

कौटुंबिक, नातेसंबंध आणि लग्न सोहळ्याची धम्माल असणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरले.रसिकांना या सिनेमांमधील फॅमिली ड्रामा चांगलाच भावला.त्यामुळेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ है','विवाह' अशा सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतले.असे सिनेमा हिंदीत तुफान हिट ठरले असले तरी मराठीत असा प्रयोग झालेला नाही.लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे.दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.'शुभ लग्न सावधान' असे या सिनेमाचे शीर्षक लक्षात घेता हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो.दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार आहे.पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होत असून प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा खूप खास ठरणार आहे.या सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँँच करण्यात आले.सुबोध आणि श्रुती यांच्यासह डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आनंद इंगळे अशी दमदार कलाकारांची तगडी फौज असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे.लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक,मित्रपरिवार एकत्र येतात.त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.