Join us  

बाबो ! कटप्पावरील प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी 'या' अभिनेत्याला लाच देण्याचा झाला होता प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 2:15 PM

'कटप्पाने बाहुबलीला का मारले''?. सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक रसिकाच्या डोक्यात हा प्रश्न घोंघावत होता. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बाहुबलीच्या दुस-या भागाला म्हणजेच . 'बाहुबली- द कन्क्लूजन’ला प्रचंड पसंती मिळाली .

'बाहुबली द बिगिनिंग' सिनेमानं चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. कमाईबाबतचे सगळे रेकॉर्ड बाहुबली सिनेमाने मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. बाहुबली सिनेमाचा सेट, यातील कलाकारांचा अभिनय, उत्कंठावर्धक कथानक यामुळे या सिनेमानं रसिकांवर मोहिनी घातली होती. या सिनेमातील बाहुबली, कटप्पा अशा विविध व्यक्तीरेखा रसिकांच्या लाडक्या बनल्या.

सगळ्याच भूमिका रसिकांच्या काळजात घर करुन गेल्या. बाहुबली सिनेमातील प्रत्येक कलाकारानं त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय दिला. त्यामुळेच की काय त्या भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सिनेमाची जास्त चर्चा झाली ती एका प्रश्नामुळे ''कटप्पाने बाहुबलीला का मारले''?. सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक रसिकाच्या डोक्यात हा प्रश्न घोंघावत होता. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बाहुबलीच्या दुस-या भागाला म्हणजेच . 'बाहुबली- द कन्क्लूजन’ला प्रचंड पसंती मिळाली .

 

देशासह जगभरातील प्रभासची आणि कटप्पा भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज यांची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली होती.हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. हिंदी भाषेत डब झालेल्या सिनेमाला बाहुबलीच्या म्हणजेच प्रभासच्या भूमिकेसाठी अभिनेता शरद केळकरने आवाज दिला होता. त्यामुळे कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर शरद केळकरला माहिती होते. प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी काहींनी थेट शरद केळकरला लाच देण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जाते. उत्तर जाणून घेण्यासाठी शरदला महागड्या वस्तू भेटमध्ये दिले जाणार असे आमिषही दिले गेले होते.

दुसरा भाग येत नाही तोपर्यंत शरदने दोन वर्ष प्रश्नाचे उत्तराची कानोकान खबर लागू दिली नाही. इतकेच काय तर बायकोलाही त्याने याचे उत्तर सांगितले नव्हते. शरदने दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला होता. 'बाहुबली द बिगिनिंग' सिनेमाला १८० कोटी खर्च करुन बनवण्यात आला होता. सिनेमाने जगभरात ६८५.५ कोटी कमाई केली होती.तर 'बाहुबली- द कन्क्लूजन’ सिनेमा २५० कोटींमध्ये बनवण्यात आला होता. या ही सिनेमाने गलेलठ्ठ कमाई करत १८१० कोटींची कमाई केली होती.

टॅग्स :बाहुबलीप्रभास