Join us

बाबो..! रिंकू राजगुरू फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, फोटो पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:49 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. कारण रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट केली आहे.

रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टू पीसमधील फोटो शेअर करत लिहिले की, स्माईल... ही मोफत थेरपी आहे. आनंदी आणि स्वस्थ राहा.रिंकू राजगुरू हिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच अचंबित झाले. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूमध्ये खूप कायापालट झाला आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूला स्वतःमध्ये बदल करावासा वाटला. त्यानंतर तिने वाचन वाढवले, वेगवेगळे चित्रपट पाहिले. वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरू लागले. तसेच तिने तिच्या फिटनेसकडे लक्ष दिले. वजन आवाक्याबाहेर जात असल्याचे जाणवल्यानंतर रिंकू राजगुरूने फिटनेसकडे लक्ष दिले. योग्य आहार आणि व्यायामाच्या जोडीने तिने स्वतःमध्ये चांगलाच बदल केला आहे. 

रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती छूमंतर या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या शिवाय ती हिंदी चित्रपट झुंडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच हिंदी वेबसीरिज जस्टिस डिलिव्हर्डमध्ये ती अमोल पालेकर यांच्यासोबत झळकणार आहे. या वेबसीरिजचे तिने काही दिवसांपूर्वी शूटिंग पूर्ण केले आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूसुव्रत जोशीप्रार्थना बेहरेऋषी सक्सेना