या मराठी चित्रपटाने ओम पूरी यांनी केली करियरची सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 11:43 IST
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे ...
या मराठी चित्रपटाने ओम पूरी यांनी केली करियरची सुरूवात
बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. ओम पूरी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी निगेटिव्ह भूमिकेत ही प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे बॉलिवुडदेखील दु:खात बुडालेला दिसत आहे. बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी त्यांना सोशलमीडियावर श्रध्दांजली वाहिली आहे. तसेच राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील त्यांना सोशलमीडियावर श्रध्दांजली वाहिली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तसेच ते बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी व्यवसायिक तसेच प्रायोगिक चित्रपटांमध्ये त्यांनी यश मिळवले. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येदेखील काम केले होते. १९८०मध्ये आलेला आक्रोश त्यांच्या चित्रपटसृष्टी करिअरमधील पहिला हिट चित्रपट ठरला. विशेष म्हणजे ओम पुरी यांनी आपल्या करियरची सुरवात घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून केली होती. एखाद्या हिरोसारखी चेहरेपट्टी नसतानाही त्यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. अर्ध सत्यमधील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली. आतापर्यंत त्यांनी तब्बल १२४ चित्रपटांमध्ये काम केले असून चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर२००४ मध्ये 'आॅनरेरी आॅफिसर आॅफ द आॅर्डर आॅफ द ब्रिटिश अॅम्पायर' या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अर्ध सत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, देहली ६, मालामाल वीकली, डॉन, रंग दे बसंती, दीवाने हुए पागल, क्यू!हो गया ना, काश आप हमारे होते आणि प्यार दिवाना होता है अशा अनेकचित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.