Join us  

ओली की सुकी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2017 10:34 AM

ओली की सुकी या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची ...

ओली की सुकी या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात रसिकांच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेला ‘ओली की सुकी’ हा चित्रपट आज २६ मे ला  प्रदर्शित होत आहे. आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित वळणावर जगण्याचा संदेश हा चित्रपट देतो. ‘विषय गंभीर तिथं खंबीर’ होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश ‘रावडी गँगची’ हजरजवाबी बोलबच्चनगिरी या सिनेमाच्या  ट्रेलरमधून अनुभवायला मिळते आहे. आयुष्याची नवीन सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही म्हणणारी ही ‘रावडी गँग’ हसत खेळत आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून देणार आहे. प्रत्येक संकटाला आत्मविश्वासपूर्वक परतवून लावण्याची भाषा बोलणारी अतरंगी मुले, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची त्यांच्याप्रती असणारी तळमळ यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत आहे. तेजश्री प्रधानसह या चित्रपटात वर्षा उसगांवकर, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लहान मुलांच्या आयुष्यात खेळासोबत आलेला चढउतार आणि वाईटाकडून चांगल्याकडे मुलांचा प्रवास अशी हटके कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक आनंद गोखले यांनी लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितले. आनंद गोखले लिखित, दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित ओली की सुकी हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.