Join us

म्हणून प्रिया बेर्डे अभिनयाव्यतिरिक्त करतात हा व्यवसाय, वाचा सविस्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 20:00 IST

पुण्यातील बावधन परिसरातील मराठा मंदिराजवळ “चख ले” या नावाने त्यांनी आपले स्वतःचे  रेस्टॉरंट सुरू केले आहे.

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले. तसेच अभिनेत्री प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. मात्र याच यादीत आता आणखीन एका अभिनेत्रीचे नाव गणले जाणार आहे. 

अभिनेत्री प्रिया बेर्डेनेही हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे . मुळात  प्रिया बेर्डे यांना कुकिंगची आवड आहे. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते खाऊ घालणे हा त्यांचा एक आवडता छंदच . या छंदाचे व्यवसायात रूपांतर व्हावे अशी त्यांची ईच्छा होती. पुण्यातील बावधन परिसरातील मराठा मंदिराजवळ “चख ले” या नावाने त्यांनी आपले स्वतःचे  रेस्टॉरंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे “पप्पू डोसा” ही इथली स्पेशालिटी आहे. 

इथल्या पदार्थांची चव चाखायला ठिकठिकाणचे खवय्ये याठिकाणी येऊन भेट देताता.  शिवाय प्रिया बेर्डे देखील आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून आपल्या रेस्टॉरंटला आवर्जुन हजेरी लावतात.  त्यांच्या रेस्टॉरंट मधील वेगवेगळ्या आणि चविष्ट पदार्थांची मागणी वाढल्याने या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. 

टॅग्स :प्रिया बेर्डे