Join us

​नावाजलेले कलाकार बोल्ड चित्रपट करीत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 11:35 IST

बॉलिवूड प्रमाणेच आता मराठी चित्रपटांमध्ये देखील बोल्ड आणि बिनधास्त विषय येत आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटांना पसंती देखील दर्शविली असल्याचे ...

बॉलिवूड प्रमाणेच आता मराठी चित्रपटांमध्ये देखील बोल्ड आणि बिनधास्त विषय येत आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटांना पसंती देखील दर्शविली असल्याचे आपण पाहतो. परंतू असे जरी असले तरी मराठीतील नावाजलेल्या कलाकारंनी मात्र असे चित्रपट करण्यास जास्त इंटरेस्ट दाखविलेले नसल्याचेच दिसले आहे. कलाकारंनी एक प्रतिमा असते त्या इमेजबाहेर जाऊन असे चित्रपट केले तर प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील का?आपल्या चाहत्यांमध्ये आपली इमेज टिकून राहील का असे अनेक प्रश्न या कलाकारांसमोर असतात. त्यामुळे आपल्याल नवोदित कलाकारच अशा चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना रवी जाधवने बालक पालक हा चित्रपट मराठीत आणला आणि त्या चित्रपटामध्ये बालकलाकार दिसले, त्यानंतर पोपट या चित्रपटामध्ये देखील अमेय वाघ सारखा नवीन कलाकारच पाहायला मिळाला. आता मिलिंद कवडे अ‍ॅडल्ट ओन्ली हा असाच बोल्ड विषयावर झुकलेला पण सामाजिक संदेश देणारा चित्रपट करीत आहेत. या सिनेमात देखील आपल्याला नवीन चेहराच दिसणार असल्याचे बोलले जातेय. याविषयी दिग्दर्शक मिलिंद कवडे सांगतात, मराठीतील चांगल्या गाजलेल्या कलाकारांची लोकांमध्ये एक प्रतिमा असते. त्यामुळे बोल्ड विषयांवरच्या चित्रपटांत काम करायचे म्हणजे त्यांच्या प्रतिमेची त्यांना काळजी असते. त्यामुळे मग त्यांच्याबरोबर काम करताना अनेक निर्बंध येतात. म्हणून नावाजलेल्या कलाकारांकडे न जाता नवीन पण रंगभूमीवर काम केलेल्या कलाकारांबरोबर हा चित्रपट करण्यात येणार आहे. अ‍ॅडल्ट्स ओन्ली या चित्रपटातून एकंदरीतच लैंगिक शिक्षण, कुमारवयीन माता याचबरोबर वेश्या व्यवसायावरही भाष्य केले असून अत्यंत बोल्ड विषय तितक्याच बोल्ड पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही कवडे यांनी सांगितले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असली, तरी चित्रपटाचा टीझर नुकताच फेसबुकवर प्रकाशित करण्यात आला आहे.