Join us

संतोष जुवेकरसाठी का असणार नवीन वर्ष खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 11:08 IST

२०१६ ला निरोप देण्यासाठी अवघ जग तयार झाले आहे. आपल्या मागील आयुष्यातील कडू आठवणींना पूर्णविराम देऊन प्रत्येकजण नवीन वर्ष ...

२०१६ ला निरोप देण्यासाठी अवघ जग तयार झाले आहे. आपल्या मागील आयुष्यातील कडू आठवणींना पूर्णविराम देऊन प्रत्येकजण नवीन वर्ष साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार तर कसे मागे राहतील. अभिनेता संतोष जुवेकरदेखील नवीन वर्ष साजरा करण्यासाठी उत्साही झाला आहे. त्याने नवीन वर्षाचा नवीन संकल्पदेखील केला आहे. तसेच हा संकल्प पूर्ण करण्याचा तो पूर्ण प्रयत्न करणार आहे. संतोष सांगतो, आयुष्यात मला खूप चांगले मित्र कमवायचे आहे. त्याचबरोबर बिझी शेडयुल्डमधून वेळ काढून फॅमिलीला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच २०१७ मध्ये खूप कामदेखील करायचे आहे. या नवीन वर्षात माझे दोन चित्रपट येणार आहेत. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. कारण यातील एक चित्रपट हिंदी असणार आहे. समीर कक्कड दिग्दर्शित आश्चर्य फक इट हा माझा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर रखमाबाई हा मराठी चित्रपटदेखील नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. अभिनेताचा संतोष जुवेकर हा सध्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतून प्रेक्षकांना दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच त्याने मोरय्या, फक्त लढ म्हणा, एक तारा, झेंडा, शहाणपण देग देवा असे अनेक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचबरोबर त्याने नेहमीच मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.