Join us

सुबोधची एक नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:57 IST

अभिनेता सुबोध भावे याने घेई छंद हे पुस्तक लिहिले असल्याचे आम्हीच तुम्हाला सर्वात आधी सांगितले होते. या पुस्तकाचा लोकार्पण ...

अभिनेता सुबोध भावे याने घेई छंद हे पुस्तक लिहिले असल्याचे आम्हीच तुम्हाला सर्वात आधी सांगितले होते. या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. बालगंधर्व रंगमंदिर येथे रसिक साहित्य आंतरभारती आणि ग्राफ ५ आयोजित या सोहळ्याला अभिनेता सुबोध भावे, संगीतकार गायक शंकर महादेवन, राष्ट्रपती पुरस्कार विजेता युवा गायक महेश काळे, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता संदिप खरे, गायिका बेला शेंडे, सचिन गवळी, निमार्ते सुनिल फडतरे, चिन्मय पाटसकर, प्रसाद सुतार, स्वप्नील वारके, साहिल कोपर्डे, लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक योगेश नांदुरकर, मनोज अडसूळ, अभय इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. घेई छंद पुस्तकाबरोबरच डिव्हीडीचेही अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. कट्यार सिनेमाचा प्रवास उलगडताना सुबोध म्हणाला, माणूस आणि कलाकार म्हणून घडताना आई - वडिलांचे संस्कार पाठिशी होते. पं. शौनक अभिषेकींमुळे गाण्यांची ओळख झाली तर राहुल देशपांडेमुळे संगीत नाटक समजले. मैतरचे प्रयोग सुरू असताना राहुलने मला कट्यारचे दिग्दर्शन कर असे सांगितले ते माझ्यासाठी मोठे आव्हान होते. ते आव्हान पेलताना मनावर मोठे दडपण होते मात्र सर्वांच्या सहकायार्मुळे ते मी पेलले. तर गायक महेश काळे म्हणाला या चित्रपटाचे यश हे सुबोध आणि शंकर महादेवन यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले आहे. सुबोधने कट्यारसाठी विचार होते तेव्हा मी सुरुवातीला नकार दिला होता असे शंकर महादेवन यांनी सांगितले. मात्रनंतर विचार केला की आजच्या जमान्यात असा निखळ संगीत देण्याची संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे मग मी हा सिनेमात काम करायचे ठरवले.