Join us

​ नाना पाटेकरांचा नेशन फर्स्ट लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:46 IST

अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ही जोडी लवकरच नव्या चित्रपटासाठी एकत्र येत आहे. गोव्यात झालेल्या इफ्फी आंतरराष्ट्रीय ...

अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ही जोडी लवकरच नव्या चित्रपटासाठी एकत्र येत आहे. गोव्यात झालेल्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान नानांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही लवकरच आमच्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. या चित्रपटाचे शीर्षक नेशन फर्स्ट असे असेल. आम्हाला उत्तम कथा मिळाली असून पुढील वर्षी हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखविण्यात आला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणे असणार नाही. तसेच हा चित्रपट केवळ १०० मिनिटांचा असेल. याबाबत बोलताना ते म्हणाले की, तीन तासांचा चित्रपट बनविण्याची मला गरज वाटत नाही. तुम्ही कमी वेळातही कथा सांगू शकता. नानांच्या अभिनयातून एक उत्तम कथा नक्कीच कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहचु शकते यात काहीच शंका नाही. परंतू हा चित्रपट हिंदी असणार का मराठी हे मात्र अजुन तरी समजलेले नाही. महेश मांजरेकर आणि नानांची जाडी आता या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जमणार आहे. नटसम्राट सारखा दर्जेदार चित्रपट या दोघांनीही प्रेक्षकांना दिला आहे. आता नेशन फर्स्ट या चित्रपटामध्ये नक्की काय असणार आहे हे तर आपल्याला लवकरच समजेल. या चित्रपटाच्या बाकी कलाकारांबद्दलही अजुन उलगडा करण्यात आलेला नाही. देशभक्तीवर भाष्य करणारा हा सिनेमा असल्याचे नावावरुनच समजतेय.