Join us  

"थोडी कॉलर टाईट झालीय कारण.."; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:15 PM

'नाच गं घुमा' मधील नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेला खास पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (mukta barve, namrata sambherao)

आज मुक्ता बर्वेचा वाढदिवस. मुक्ताला आपण आजवर विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मुक्ताला आज तिचे चाहते आणि विविध कलाकार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मुक्ताचा नुकताच रिलीज झालेला 'नाच गं घुमा' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात मुक्ता आणि नम्रता संभेराव यांच्या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. अशातच मुक्ताच्या वाढदिवशी नम्रताने खास पोस्ट शेअर केलीय. 

नम्रताने मुक्तासोबतचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "Happy birthday मुक्ता बर्वे tai.  my idol my inspiration.  तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत..  आपला सिनेमा superhit झाला ताई.. तुझ्यासारख्या दिग्गज बलाढ्य अभिनेत्रीसमोर उभं राहण्याची ताकद मला तुझ्यामुळेच मिळाली कारण तू खूप आपलंस केलंस comfortable केलंस.. मला एवढं बळ दिल्याबद्दल मनापासून thanks..  मी तुझी अजून मोट्ठी fan झाले आणि आता तू माझी मैत्रिण सुद्धा झालीस म्हणून थोडी कॉलर पण टाईट झालीय.. love u so much tai.."

अशाप्रकारे नम्रताने मुक्ताच्या वाढदिवशी खास पोस्ट लिहून तिच्याविषयी मनातला आदर दर्शवलाय. 'नाच गं घुमा' मध्ये मुक्ता आणि नम्रता या दोन्ही अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. मुक्ता - नम्रता दोन्ही अभिनेत्रींच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. 'नाच गं घुमा' सिनेमा १ मेला रिलीज झाला. सिनेमाने आजवर १५ कोटींपेक्षा जास्त बॉक्स ऑफिस गल्ला जमावला आहे.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमुक्ता बर्वेमराठीमराठी अभिनेता