Join us  

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे चंद्रपूर पोलिसांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 2:26 PM

Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar), सायली पाटील (Sayali Patil) अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 

'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.

ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे डॅशिंग लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या लूकवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज आवडला असून आता हा तडफदार पोलीस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे नागराज मंजुळेंच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला नवीन ॲक्शन हिरो मिळणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दिप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टॅग्स :नागराज मंजुळे