आरोह घेत आहे फिटनेसवर मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:55 IST
प्रत्येक व्यक्ती हा थंडीमध्ये आपली शरीरयष्टी चांगली राहावी म्हणून व्यायाम करण्यासाठी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कलाकार ...
आरोह घेत आहे फिटनेसवर मेहनत
प्रत्येक व्यक्ती हा थंडीमध्ये आपली शरीरयष्टी चांगली राहावी म्हणून व्यायाम करण्यासाठी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कलाकार हे नेहमीच आपल्या फिटनेसवर अधिक लक्ष देताना पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आरोह वेलणकर मात्र आपल्या फिटनेसवर अधिक मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत. कारण नुकतेच आरोहने सोशल मीडियावर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे.त्याच्या या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. त्याच्या या फिटनेस मेहनतविषयी लोकमत सीएनएक्सला आरोह सांगतो, एका चित्रपटासाठी ही कठोर मेहनत करत आहे. रोज मी दीड तास वर्कआऊट करत आहे. मात्र गेली तीन वर्ष व्यायाम करत असल्यामुळे, वर्कआऊटचा देखील अंदाज आला आहे. त्याचप्रमाणे खाण्यापिण्यावर खूपच नियंत्रण ठेवले आहे. कारण आयुष्यात मला फक्त अभिनयच करता येतो. त्यामुळे या चित्रपटासाठी मी स्वत:ला झोकून देवून काम करण्याची तयारी करत आहे. तसेच या चित्रपटाचे चित्रिकरणदेखील सुरू झाले आहे. यासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागेल. सध्या आरोहजवळ दोन चित्रपट असल्याचे त्याने सांगितले आहे. यातील एका चित्रपटासाठी तो घोडेसवारीचेदेखील प्रशिक्षण घेत आहे. एकीकडे घोडेसवारी तर दुसरीकडे जीम वर्क आऊटवर मेहनत घेताना आरोह पाहायला मिळत आहे. आरोह यापूर्वी घंटा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता अमेय वाघ आणि सक्षम कुलकर्णीदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले. तसेच तो रेगे या चित्रपटातदेखील झळकला होता. आता आरोहचा हटके लूक पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही वेळ वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.