Join us

​ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:33 IST

सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या बहुचर्चित चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर होत आहे. रविवारी, २५ डिसेंबर ...

सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या बहुचर्चित चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर होत आहे. रविवारी, २५ डिसेंबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८:३० वाजता हा चित्रपट पाहता येईल. एकत्र कुटुंब पद्धत असलेल्या राजवाडे घराण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. मात्र, एकत्र कुटुंबातील नव्या पिढीचे नवे विचार आणि नव्या जाणिवा हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या तरूणांचं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठी राजवाडे अँड सन्सचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहायलाच हवा. दमदार स्टारकास्ट हे राजवाडे अँड सन्सचं प्रमुख वैशिष्ट्य. सतीश आळेकर, ज्योती सुभाष, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, राहुल मेहेंदळे, अमित्रियान पाटील, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ मेनन, कृत्तिका देव, आलोक राजवाडे असे जुन्या आणि नव्या पिढीतले उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. त्यामुळे अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी राजवाडे अँड सन्स पहायलाच हवा. चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. जुन्या पिढीचे आणि नव्या पिढीचे विचार तो ताकदीनं मांडतो. नव्या पिढीची भाषा त्याला नेमकी माहीत आहे. त्यामुळे त्याचे संवाद तरूण पिढीची दाद मिळवतात. स्वत:चं चित्रपटाचं लेखन केलेलं असल्यानं ते पडद्यावर कसं आणि किती छान दिसेल याचं नेमका अंदाजही त्याला असतो. त्यामुळे सचिनच्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर असते. फ्रेश लुक ही सचिन कुंडलकरच्या चित्रपटाची खासियत आहे. आत्ताच्या पिढीचा ड्रेसिंग सेन्स, लेटेस्ट फॅशन, उत्तम रंगसंगती या चित्रपटात असल्यानं चित्रपटाचा लुक एकदम फ्रेश आहे. उत्तम कथानकाला उत्तम संगीताची जोड असली की चित्रपट अजून आनंद देतो. राजवाडे अँड सन्सच्या गाण्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटातलं तगमग हे गाणं हिट झालं. उत्तम संगीत ऐकण्यासाठी राजवाडे अँड सन्स पहायलाच हवा.