प्रतिक हरवला आईच्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 16:54 IST
प्रतिक बब्बरने बॉलिवूडमध्ये काही निवडक चित्रपट केल्यानंतर सहसा तो कुठे दिसला नाही. स्मिता पाटील यांचा मुलगा म्हणुन देखील त्याची ...
प्रतिक हरवला आईच्या आठवणीत
प्रतिक बब्बरने बॉलिवूडमध्ये काही निवडक चित्रपट केल्यानंतर सहसा तो कुठे दिसला नाही. स्मिता पाटील यांचा मुलगा म्हणुन देखील त्याची आज इंडस्ट्रीत ओळख आहे. नुकतेच प्रतिकने इन्स्टाग्रामवर आई बददल एक पोस्ट लिहीली आहे. एक महान महिलेचा मुलगा म्हणून मला आईचा अभिमान वाटतो. तिला अभिमान वाटेल अशी कामगिरी मी करेन. जोपर्यंत हे साध्य होत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, असे प्रतिक बब्बरने म्हटले आहे. स्मिता पाटील यांची १३ डिसेंबरला पुण्यतिथी होती. म्हणुनच प्रतिकने आईसाठी ही पोस्ट लिहीली. हिंदी चित्रपटाचा रुपेरी पडदा गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटीलचा मृत्यू १३ डिसेंबर १९८६ रोजी झाला होता. आपल्या आईच्या प्रेमाला पोरका झालेला प्रतिक तिच्या आठवणीने गहिवरला. त्याने इन्स्टाग्रामवर स्मिता पाटीलचा फोटो पोस्ट केला. या फोटो खाली आपल्या आईविषयीच्या भावना त्याने लिहिल्या आहेत. ३० वषार्पूर्वी १३ डिसेंबरला माज्या आईच्या मृत्यू झाला होता. स्मिता पाटीलची प्रेरणा अजूनही जिवंत आहे. ती आमच्यात गर्वाने आणि सन्मानाने राहील. ३० वषार्नंतरही संपूर्ण देशाला आपण तिला हरवल्याची जाणीव आहे. तिने जे साध्य केलं आहे याचा अभिमान वाटतो. तिने लोकांसाठी जे केले आहे ते खूपच सुंदर आहे, असे प्रतिकने लिहिले आहे. मुळचे धुळ्याचे असलेले शिवाजीराव पाटील आणि विद्यादेवी पाटील यांच्या स्मिता कन्या होत्या. स्मिताचे शिक्षण आणि बालपण पुण्यातच गेले. सिनेमाच्या करिअरच्या एक टप्प्यावर तिने अभिनेता राज बब्बर यांच्याशी लग्न केले. पण मुलगा अभिनेता प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर स्मिता पाटील यांची तब्येत थोडी बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. आईच्या आठवणींना प्रतिकने सोशल साईट्सवर उजाळा दिला.