Join us  

रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:56 PM

Raada: फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत 'राडा' (raada) या आगामी चित्रपटाची चर्चा रंगत आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर या चित्रपटात झळकणाऱ्या कलाकारांच्या भूमिकांवरील पडदाही दूर होतांना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. यामध्येच आता या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही काळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा टीझर पाहिल्यापासून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून या चित्रपटात थरारक दृश्ये, अ‍ॅक्शन सीन्स आणि भन्नाट लव्हस्टोरी यांचा पुरेपूर भरणा केल्याचं लक्षात येतं. इतकंच नाही तर अगदी साऊथ स्टाइलप्रमाणे या चित्रपटाची निर्मिती केल्याचंही दिसून येतं.

राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटात अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार हा मुख्य भूमिका साकारत असून समा असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. आकाशसोबत या चित्रपटात मिलिंद गुणाजी (milind gunaji), संजय खापरे (sanjay khapre), गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य (Ganesh Acharya) , निशिगंधा वाड (nishigandha wad), योगिता चव्हाण yogita chavan) , सिया पाटील, हिना पांचाळ (heena panchal), शिल्पा ठाकरे हे कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश सोपानराव नरवाडे करत असून निर्मिती राम शेट्टी करत आहेत. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीनिशिगंधा वाडगणेश आचार्यहिना पांचाळमिलिंद गुणाजी