Join us  

​हा दाक्षिणात्य अभिनेता मृण्मयी देशपांडेसोबत दिसणार मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 5:49 AM

साताऱ्यातील सुप्रसिद्ध निर्माते मधुकर आण्णा देशपांडे यांच्या शांभवी फिल्मसद्वारे बनविल्या जाणाऱ्या बेभान या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. हे ...

साताऱ्यातील सुप्रसिद्ध निर्माते मधुकर आण्णा देशपांडे यांच्या शांभवी फिल्मसद्वारे बनविल्या जाणाऱ्या बेभान या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. हे चित्रीकरण सातारा शहरासह संगम माहुली, कास, विटा, कोल्हापूर येथे संपन्न झाले.  या चित्रपटात बॉडी बिल्डर आणि मिस्टर वर्ल्ड किताब विजेते अनुपसिंह ठाकूर मुख्य भूमिकेत असून मृण्मयी देशपांडे या चित्रपटाची नायिका आहे. याच सोबत संजय खापरे, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर आदींच्या देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बिग बजेट असून मराठी भाषेसह इतर चार भाषेत डब केला जाणार आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियन भाषेतही हा चित्रपट डब करण्यात येणार आहे. मधुकर देशपांडे निर्मित बेभान या चित्रपटाचे अनुप जगदाळे यांनी दिग्दर्शन केले असून प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. ही कथा आण्णा देशपांडे यांचे चिरंजीव दिनेश देशपांडे यांची आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्याात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये अभिनेते म्हणून काम करणारे दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेते अनुपसिंह ठाकूर हे मराठीत काम करण्यास खूपच उत्सुक होते. त्यांनी आजवर कमांडो २, सिंघम ३ यांसारख्या दाक्षिणात्य सिनेमात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनुपसिंह ठाकूर पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रामुख्याने सातारा शहर आणि परिसराला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील पर्यटकांना आकर्षित करणारे निसर्ग जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवलेले कास पठार तसेच दक्षिणकाशी म्हणून लोकप्रिय असलेला कृष्णा वेण्णा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिरात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्यासोबत समुहनृत्य देखील चित्रीत करण्यात आले आहे. मराठमोळ्या रूपातील नववारी साडीत घोड्यावर बसलेली मृण्मयी हे या नृत्यातील विशेष आकर्षण ठरणार आहे. Also Read : ​मृण्मयी देशपांडेने सुव्रत जोशीशी केले लग्न?