राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ‘कच्चा लिंबू’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट! नागराज मंजुळे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:22 IST
भारतीय सिनेसृृष्टीत अतिशय मानाच्या समजल्या जाणाºया ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपट व कलाकारांनी डोळ्यात भरणारं मिळवलं. आज ...
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ‘कच्चा लिंबू’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट! नागराज मंजुळे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक!!
भारतीय सिनेसृृष्टीत अतिशय मानाच्या समजल्या जाणाºया ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपट व कलाकारांनी डोळ्यात भरणारं मिळवलं. आज दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा झाली. अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्कारावर नाव कोरले. तर ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला. या लघुपटाने सर्वोत्कृष्ट आॅडिओग्राफीचा पुरस्कारही आपल्या नावावर केला. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. ‘धप्पा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरवण्यात आले तर राजेंद्र जंगलेची‘चंदेरीनामा’ बेस्ट प्रमोशनल फिल्म ठरली. ‘मृत्यूभोग’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झाला.‘व्हिलेज रॉकस्टार’ला सुवर्णकमळ, ‘न्यूटन’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटसर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवत,‘व्हिलेज रॉकस्टार’ या आसामी चित्रपटाने सुवर्णकमळावर नाव कोरले. तर आॅस्करवारी करून आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला.सुवर्णकमळावर नाव कोरणाºया ‘व्हिलेज रॉकस्टार’ची कथा एका दहा वर्षांच्या चिमुकलीची कथा आहे. एकदिवस माझ्याकडे खेळण्यातील गिटार नाही तर खरोखरचे गिटार असेल, या आशेवर जगणारी, स्वरांच्या दुनियेत मश्गुल असणाºया या मुलीचे एक वेगळे जग आहे. पण काही बºयावाईट परंपरा जपणाºया समाजातील तिचे हे जग पुरते आभासी आहे.कारण वास्तव काही वेगळेच आहे, असे या चित्रपटाचे कथानक आहे. रिमा दास दिग्दर्शित या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक चित्रपट महोत्सवात धूम केलीय. मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला होता, तेव्हा या रिमा दास यांच्या या चित्रपटाची तुलना सत्यजीत राय यांच्या ‘पाथेर पंचाली’ या क्लासिक चित्रपटासोबत केली गेली होती. आता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही आपल्या झोळीत टाकला आहे.श्रीदेवी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी व खुशी या दोघींनीही याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया बोनी कपूर यांनी दिली आहे.विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कारदिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मानकरी पुढीलप्रमाणे- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सबाहुबलीसर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीगणेश आचार्य - टॉयलेट एक प्रेमकथा - गोरी तू लठ्ठ मारसर्वोत्कृष्ट अॅक्शनबाहुबलीसर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट जीएचएचसर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटटू लेटसर्वोत्कृष्ट आसामी चित्रपटइशूसर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपटगाझी अटॅकसर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट मयुराक्षीसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटन्यूटन सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट हेब्बेतू रमक्कासर्वोत्कृष्ट तुल्लू चित्रपट पड्ड्यीसर्वोत्कृष्ट लडाखी चित्रपटवॉकिंग विथ द वाईंडसर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट थोंडीमुथलम दृश्यकाशियमसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटकच्चा लिंबूसर्वोत्कृष्ट ओरिसा चित्रपट हॅलो आरसीसर्वोत्कृष्ट जसारी चित्रपट सिंजरस्पेशल मेन्शन चित्रपटमोरक्या- मराठी चित्रपटसर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्ममय्यत (मराठी शॉर्टफिल्म)सर्वोत्कृष्ट चित्रपट (सामाजिक प्रश्न)आय एम बोनीव्हेल डनसर्वोत्कृष्ट चित्रपट (आर्ट अँड कल्चर)गिरिजा ः अ लाइफ ऑफ म्युझिकसर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट द फिश करी अँड टोकरी ः द बास्केटसर्वोत्कृष्ट दिग्दर्शकनागराज मंजुळेस्पेशल ज्युरी अॅवॉर्डअ व्हेरी ऑल्ड मॅन विथ इनॉरमस विंग्ससर्वोत्कृष्ट एज्युकेशनल चित्रपटद ग्लर्स वुई वेअर अँड द वुमन वुई आरसर्वोत्कृष्ट नॉन फिचर चित्रपट वॉटर बेबीसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दिव्या दत्ता - इरादासर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता फहाद फाजिल - थोंडीमुथलम दृश्यकाशियमसर्वोत्कृष्ट गायकके जी येसुदास - पोय मारजा कलम - विश्वरूपम मन्सूरसर्वोत्कृष्ट गायिकाशाशा तिरुपती - वाण - काकरु वेलियिडईसर्वोत्कृष्ट गीतकारजे. एम. प्रल्हाद - मुथुराथ्नासर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीभयानकम (मल्याळम चित्रपट)सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेड स्क्रीनप्लेभयानकम (मल्याळम चित्रपट)सर्वोत्कृष्ट ऑरिजनल स्क्रीनप्लेथोंडीमुथलम दृश्यकाशियम (मल्याळम चित्रपट)सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीव्हिलेज रॉकस्टार (आसामी चित्रपट)सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन वॉकिंग विथ द वाईंड (आसामी चित्रपट)सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनटेक ऑफ (मल्याळम चित्रपट)सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टनगर किर्तन (बंगाली चित्रपट)सर्वोत्कृष्ट बँकराऊंड स्कोर ए आर रहमान (मॉम)सर्वोत्कृष्ट म्युझिककाकरु वेलियिडई सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीश्रीदेवी (मॉम)सर्वोत्कृष्ट अभिनेता रिधी सेन - नगरकिर्तन - बंगाली चित्रपटदादासाहेब फाळके पुरस्कारदिवंगत विनोद खन्नानर्गिस दत्त पुरस्कारथप्पा (मराठी चित्रपट)सर्वोत्कृष्ट चित्रपट व्हिलेज रॉकस्टार - आसामी चित्रपटसर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पॅम्पाली - सिंजरसर्वोत्कृष्ट बालकलाकार बनिता दास - व्हिलेज रॉकस्टार (आसामी चित्रपट)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकजयराज - भयानकम (मल्याळम चित्रपट)सर्वोत्कृष्ट बालचित्रपटम्होरक्या