Join us

'धुरळा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या कलाकारांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 17:58 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिले होते. त्यामुळे नेमकं असा हॅशटॅग का वापरला असेल, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मराठी कलाकारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असं समजून अनेकांनी या कलाकारांना पाठिंबा दिला, तर अनेकांनी ट्रोलही केलं.मात्र आज 'धुरळा' नावाच्या सिनेमाचा ट्रेलर समोर आला आणि कलाकारांचा #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगमागचे उत्तर सापडले. #पुन्हानिवडणूक? हॅशटॅग सोशल मीडियावर तुफान हिट ठरला मात्र हा 'धुरळा' सिनेमाचा प्रमाशनचा एक भाग होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

धुरळा सिनेमा राजकीय  पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत. सिनेमात  अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ कलाकारांच्या भूमिक आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना आणखीन थोडा वेळ वाट पाहावी लागणार असून ३ जानेवारी २०२० मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरसिद्धार्थ जाधवअंकुश चौधरी