Join us

नाकापेक्षा नथ जड! नथीमुळे सोनाली कुलकर्णीची झाली मोठी पंचायत, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:07 IST

नथीमुळे सोनाली कुलकर्णीला खाताही येईना, शेअर केला व्हिडिओ

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी सोनाली कायमच चर्चेत असते. 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'नटरंग', 'मितवा', 'क्लासमेट्स', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' हे सोनालीचे काही गाजलेले चित्रपट. सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नखरेल अदांनी घायाळ करणाऱ्या सोनालीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. करिअरमधील अपडेटबरोबरच वैयक्तिक जीवनातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. नुकतंच सोनाली तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने निळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. गळ्यात पारंपरिक दागिने घालून तिने मराठमोळा साज केला आहे. तर सोनालीच्या नथीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. पण, या नथीमुळे तिची पंचायत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नथीमुळे सोनालीला खाताही येत नसल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हाताने नथ पकडून सोनाली खात आहे. हा मजेशीर व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोनालीच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. "नाकापेक्षा नथ जड", "नाकापेक्षा नथ मोठी", "नाकापेक्षा मोती जड" अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी