Join us  

'तू नजरे भवताली रे...'; आर्याने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षामुळे चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:39 PM

Aarya ambekar: अलिकडेच आर्याने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी साडी नेसून त्यावर छानसा शेला घेतला आहे.

उत्तम गायिका, अभिनेत्री आणि तितकाच लोभसवाणा चेहरा यामुळे आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत झालेली प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजे आर्या आंबेकर (Aarya Ambekar). कलाविश्वात सक्रीय असलेली आर्या सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला. आर्यादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यावेळीदेखील तिने एक व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पारंपरिक असो वा वेस्टर्न आर्या कोणत्याही लूकमध्ये चाहत्यांना आवडते. मात्र, ज्यावेळी ती पारंपरिक लूक करते त्यावेळी नेटकरी तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

अलिकडेच आर्याने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी साडी नेसून त्यावर छानसा शेला घेतला आहे. सोबतच पारंपरिक दागदागिन्यांनी ती छान सजली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने बँकग्राऊंडला 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातलं 'बहरला हा मधुमास' हे गाणं प्ले केलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

दरम्यान, 'चैत्रात गाई कोकिळा कुहू कुहू गाणी, रूपवती आणि सृजनशील दिसते आर्या राणी..सृजना',  असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. आर्याने हा व्हिडीओ एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी केल्याचं दिसून येत आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून आर्या प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, गायिका म्हणून ती ओळखली जाते. 

टॅग्स :आर्या आंबेकरसेलिब्रिटीसिनेमा