Join us  

प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:05 AM

Priya bapat: प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत येणारी प्रिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तिच्या नाटक, वेबसीरिज आणि सिनेमांमुळे चर्चेत येत आहे. सध्या प्रियाने तिच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घेतला असून ती व्हेकेशन एन्जॉय करत आहे. प्रिया आणि उमेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या व्हेकेशनमध्ये तिच्यासोबत काही लोकप्रिय मराठी कलाकारदेखील गेले आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यातील प्रियाचे काही बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत असून तिने समुद्रकिनाऱ्यावर हे फोटोशूट केलं आहे. प्रियाचे बिकिनीतील फोटो पाहून सध्या नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी तिला ट्रोल केलं आहे. त्यामुळे प्रियाचे हे फोटो चर्चेत येत आहेत.

दरम्यान, प्रिया या बिकिनी लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्ट दिसून येत आहे. सध्या प्रिया आणि उमेश ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांच्यासोबतच पल्लवी पाटील, आशुतोष गोखले , अमोघ फडके, अद्वैत आठवले ही कालाकार मंडळी सुद्धा आहेत. सध्या हे सगळे कलाकार जर तरची गोष्ट या नाटकामध्येही एकत्र काम करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीउमेश कामतसिनेमा