Join us

इतक्या वर्षांत इतकी बदलली प्रार्थना बेहरे ; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 19:37 IST

रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 

प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते.

त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्यासाठीही तिच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत. 

आज चित्रपटसृष्टीतील प्रमुख नायिकांमध्ये गणना होत असलेल्या प्रार्थनासाठी ते दिवस ओल्ड इज गोल्ड असेच आहेत. आम्ही असं म्हणतोय याला कारण ठरलीय तिची इन्स्टाग्राम पोस्ट.

यामध्ये तिने पहिल्यावहिल्या फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा ड्रेस, मोकळे सोडलेले केस आणि पाठीमागे समुद्राच्या लाटा अशा अंदाजातील प्रार्थनाचा पहिल्या फोटोशूटमधील फोटो घायाळ करणारा असा आहे. 

या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे.

रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.