Join us  

सिद्धेशमधील केवळ 'या' एका गुणावर भाळली पूजा; त्याचक्षणी केली जोडीदार म्हणून त्याची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 5:38 PM

Pooja sawant: पूजाने नुकतंच सिद्धेशची निवड लाइफ पार्टनर म्हणून का केली यामागचं कारण सांगितलं आहे.

मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करुन लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (pooja sawant). आतापर्यंत अभिनयामुळे चर्चेत येणारी पूजा सध्या तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. सोबतच कोणासोबत लग्नगाठ बांधणार हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे नेटकरी सध्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलिकडेच पूजाने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.सोबतच लाइफ पार्टनर म्हणून सिद्धेशची निवड का केली हे सुद्धा तिने सांगितलं. 

'सिद्धेशमधल्या कोणत्या क्वालिटी पाहून त्याची जोडीदार म्हणून निवड केली?' असा प्रश्न पूजाला विचारण्यात आला. त्यावर, "तो हँडसम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची त्याच्यातली क्वालिटी म्हणजे त्याला माहितीये की काय केल्यामुळे मी खूश होते किंवा मला छान वाटतं, मी हसते. मला वाईट वाटत असेल, मी रागात असेल तर त्याला माहित असतं की त्यावेळी काय करायचंय. मग त्याच्या दुसऱ्या क्षणाला मी हसत असते. त्यामुळे त्याच्यातली हीच क्वालिटी मला खूप आवडते," असं पूजा म्हणाली.

दरम्यान, पूजा सावंत पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाचाही प्लॅन सांगितला. त्यामुळे आता चाहत्यांना तिच्या लग्नाचे वेध लागले आहेत. पूजा, सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड