Join us  

"इथे संकटं पेरली आहेत प्रत्येक पावलांवरती...", मुक्ता बर्वेची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 6:39 PM

मुक्ता बर्वे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve ) हा सिनेमा येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय. मात्र त्या आधी या सिनेमानं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. मुक्ता या सिनेमाशी संबंधीत काहींना काही अपडेट चाहत्यांना देत असते. नुकताच मुक्ता एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मुक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसतेय. इथे संकटं पेरली आहेत प्रत्येक पावलांवरती...'ती' चा प्रवास सुरु होतोय २४ जूनपासून 'वाय' येतोय फक्त ४ दिवसात आपल्या भेटीला असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

काय आहे नेमका ‘Y’? ‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. अनेक नद्या एकत्र येऊन समुद्र तयार होतो. तसा हा हायपरलिंक सिनेमा असणार आहे. यासाठी खूप तगडा स्क्रीनप्ले असण्याची गरज असते आणि जो आमच्या लेखक टीम आणि दिग्दर्शकाने चांगलाच बांधलाय. ज्याच्या मी प्रेमात पडले आणि सिनेमा करायला घेतला, असं मुक्ताने यावेळी सांगितलं. 

टॅग्स :मुक्ता बर्वे