Join us  

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या घूँघटमधील फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:00 PM

ही अभिनेत्री बऱ्याचदा सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटो आणि डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत येत असते.

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीदेखील ती हटक्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

मीरा जोशी बऱ्याचदा सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटो आणि डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. मीराने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने घूँघट असे कॅप्शन दिले आहे. यात ती भलेही घूँघटमध्ये दिसत असली तरी ती ट्रान्सपरेंट घुँघटमध्ये सुंदर दिसते आहे. 

मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत झळकली होती. यात तिने एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती.

याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.'

'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

टॅग्स :मीरा जोशी