Join us  

नववधू अंदाजातील या मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 6:30 AM

एकंदरितच रिल लाईफमध्ये जितकी मयुरी सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येही मयुरीवर सगळेच फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मयुरीने साकारलेली सरळ साध्या स्वभावाची मानसीला सा-यांची पसंती मिळाली होती. त्यानंतर 'लग्नकल्लोळ' सिनेमातही ती झळकली होती. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मयुरी देशमुखनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकताच मयुरीने स्वतःचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा नववधू रुपातील मयुरीचा अंदाज पाहून चाहते फुल ऑन तिच्यावर फिदा झाले आहेत. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या मयुरीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 

लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये तिचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. आता फोटो नेमका कधीचा आणि कसला आहे याविषयी माहिती समोर आली नसून या फोटोचं वास्तव काय असे अनेक प्रश्न सध्या तिच्या  फॅन्सना पडले आहेत. सध्या वेडींग सिझन सुरू असल्यामुळे अनेक मुलींना त्यांच्या लग्नात अगदी मयुरीप्रमाणेच दिसावे अशी इच्छा बाळगताना दिसतायेत.एकंदरितच रिल लाईफमध्ये जितकी मयुरी सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येही मयुरीवर सगळेच फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे ख-या आयुष्यात मयुरी  वयाच्या 25 व्या वर्षीच लग्नबंधनात अडकली. आशुतोष भाकरेसह मयुरीने लग्न केले असून आशुतोषही एक कलाकार आहे.यापूर्वी आशुतोषने इचार ठरला पक्का, बायको असावी अशी आणि भाकर या सिनेमांमध्ये आशुतोषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :मयुरी देशमुख