Join us

मराठी अभिनेत्यांची पडद्यावरील आणि पडद्यामागची खास मैत्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 11:48 IST

-रवींद्र मोरे मराठी इंडस्ट्रीत पडद्यावर अनेकांनी एकत्र मित्राच्या भूमिका साकारल्या आहेतच सोबतच ते कलाकार प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच चांगले मित्र ...

-रवींद्र मोरे मराठी इंडस्ट्रीत पडद्यावर अनेकांनी एकत्र मित्राच्या भूमिका साकारल्या आहेतच सोबतच ते कलाकार प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच चांगले मित्र होते आणि आहेत. इंडस्ट्रीत मोठे कलाकार होण्याआधीपासून अनेकांनी एकत्र काम केले आहे आणि आज स्टार झाल्यानंतरही त्यांची मैत्री तशीच कायम आहे. काही मित्र सोडून गेलेत तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत. अशाच काही मराठी कलाकार मित्रांच्या जोड्या.* लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिनमराठी सिने इंडस्ट्रीतील या चारही सुपरस्टार कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही त्यांचे सिनेमे आवडीने बघितले जातात. हे चारही कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र म्हणूनही ओळखले जातात. कित्येक सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. कित्येक सिनेमे त्यांनी एकत्र गाजवले आहेत. त्यांची मैत्री सिनेमातून आणि प्रत्यक्ष आयूष्यातही सर्वांनाचा प्रोत्साहन देणारी अशीच आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे हयात नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा नेहमीच दिला जातो.* भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवभरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र मित्रांचं काम केलंय. दोघांचीही केमिस्ट्री अफलातून असून पडद्यावर आणि पडद्यामागेही हे दोघे चांगले मित्र आहेत. सिनेमात येण्याआधीपासून या जोडीने अनेक नाटकांमध्ये आपला जलवा दाखवला आहे.* भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदेहे तिघेही कॉलेज जीवनापासून एकत्र काम करत असून अनेक एकांकीका आणि नाटकांचे प्रयोग यांनी एकत्र केले आहे. पुढे अनेक सिनेमांमध्येही हे एकत्र बघायला मिळाले आहेत. इंडस्ट्रीतील या तिघांची मैत्री चांगलीच प्रसिद्धही आहे.* सिद्धार्थ जाधव-जितेंद्र जोशीसिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांचीही मैत्री चांगलीच लोकप्रिय आहे. दोघेही मराठीतील आघाडीचे अभिनेते असूनही कधीही या कलाकारांमध्ये वैर बघायला मिळत नाही. एकमेकांच्या सिनेमांची प्रशंसा करणे, त्या सिनेमाबद्दल दिलखुलास प्रतिक्रिया देणे हे सहजपणे मराठी इंडस्ट्रीत बघायला मिळतं.* प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीप्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री यांचीही पडद्यावरील आणि पडद्यामागची मैत्री चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक सिनेमांमध्ये यांनी एकत्र काम केले आहे.* सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेसिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे दोघेही पुण्यातील अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सिनेमांमध्ये एकत्र काम करण्याआधीपासून ते एकमेकांना चांगले ओळखतात.