Join us  

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या मराठी कलाकाराचा संघर्ष, घरखर्च चालवण्यासाठी पत्नीला करावे लागते घरकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 2:27 PM

आगामी चित्रपटांना चांगलं यश मिळेल, चांगल्या ऑफर मिळतील आणि पत्नीचा संघर्षही लवकरच कमी होईल असा विश्वास वीरा साथीदार यांना आहे.

ठळक मुद्दे'कोर्ट' या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती.घरी बिकट परिस्थिती असली तरी त्याचा वीरा साथीदार सामना करत आहेत.राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला. इतके पुरस्कार मिळूनही वीरा साथीदार यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही.

चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य ऐशोआरामाचं असतं. त्यांची जीवनशैली फारच उच्च असते असं आपण पाहतो. त्यातच एखादा चित्रपट सुपरहिट झाला, त्या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला की त्या चित्रपटातील कलाकाराचं आयुष्यच पालटतं हेही आपण वारंवार पाहिलंय. मात्र एक कलाकार असा आहे की ज्याच्या चित्रपटाला आभाळाएवढं यश मिळालं तरी त्या कलाकाराचं जीवन काही बदललं नाही. या कलाकाराचं नाव आहे वीरा साथीदार. हे नाव तसं तुम्हाला चटकन आठवणार नाही. मात्र त्यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटाविषयी आणि त्याचं नाव सांगितलं तर त्या कलाकाराची झलक तुमच्या डोळ्यासमोर येईल. 

'कोर्ट' या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती. कोर्ट या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी कोर्ट चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला. मात्र इतके पुरस्कार मिळूनही वीरा साथीदार यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही. या गोष्टीचं वीरा साथीदार यांनी कधीही भांडवल केलं नाही. घरी बिकट परिस्थिती असली तरी त्याचा वीरा साथीदार सामना करत आहेत. नागपूरच्या बाबुलखेडामध्ये भाड्याच्या घरात राहणारे वीरा साथीदार लेखन आणि लेक्चर घेऊन उदरनिर्वाह करतात. मात्र वीरा साथीदार यांना सगळ्यात जास्त दुःख हे पत्नी घरी येऊ शकत नसल्याचे आहे. त्यांची पत्नी पुष्पा या परसोडी गावात अंगणवाडीत काम करतात. ही अंगणवाडी नागपूरपासून 30 किमी अंतरावर आहे. काम संपल्यानंतर त्यांची पत्नी अंगणवाडी जिथे तिथेच राहतात. पुष्पा या दरमहा सात हजार रुपये कमावतात आणि घर चालवण्यासाठी मदत करतात. 

तिथेच लोकांच्या घरी त्या कामही करतात. त्याचा मोबदला म्हणून त्या तिथे राहतात आणि जेवतात. पत्नीला आराम मिळावा असं वीरा साथीदार यांना वाटतं. दर आठवड्याला पत्नी कधी घरी येईल याची ते वाट पाहत असतात. तिला आराम मिळावा आणि तिला चहा तसंच जेवण करून देण्याची वीरा यांची इच्छा आहे. आगामी चित्रपटांना चांगलं यश मिळेल, चांगल्या ऑफर मिळतील आणि पत्नीचा संघर्षही लवकरच कमी होईल असा विश्वास वीरा साथीदार यांना आहे.    

टॅग्स :वीरा साथीदार