Join us  

मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 3:38 PM

HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी(२१  मे) जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. पुतणीसाठी संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

संतोषने पुतणीबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "आमचं पोरग १२ तप पूर्ण करून आमच्यासाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन आलंय...आमचं पोरगं पास झालं. नुसतं पास नाही आख्ख्या जुवेकर खानदानाचे पूर्वी पासून हरवलेले मार्क आणि टक्के एकत्र आणि एकटं घेऊन आलं. म्हणून तर कुणा एका सिनेमात बोलून ठेवलंय " म्हारी छोरी छोरोंसे कम हे के " आमची धाकड girl...पिल्लू आम्ही सगळे proud of u...खूप खूप अभिनंदन तूला पिल्ल्या...खूप मोठ्ठा हो पिल्ल्या ये काका तेरे साथ हे...गाणं तुझ्या आवडीचं लावल हं!", असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. संतोष जुवेकरच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या पुतणीचं अभिनंदन केलं आहे. 

दरम्यान, यंदा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता.

२१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यापैकी कोकण विभागचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के एवढा आहे तर सर्वाधिक कमी निकाल मुंबई ९१.९५ एवढा लागला आहे.

टॅग्स :संतोष जुवेकर12वी परीक्षाबारावी निकालमराठी अभिनेता