Join us  

प्रवीण तरडे यांच्या कुटुंबियांचे फोटो पाहिले का? पत्नी आहे खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 8:00 AM

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात.

ठळक मुद्देप्रवीण तरडे यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी देखील लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

प्रवीण तरडे यांना चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी जाणून घ्यायची नेहमीच इच्छा असते. प्रवीण देखील त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी अपडेट देत असतात. त्यांना सोशल मीडियावर त्यांचे अनेक चाहते फॉलो करतात.

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात. त्यांची पत्नी अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी देखील लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, प्रवीण दिवसभर झोपतात आणि रात्रीच्या वेळी काम करतात. तसेच त्यांच्यासाठी कुटुंबाच्याआधी मित्र येतात. पण त्यांचे फ्रेंड्स आमच्या प्रत्येक संकटात, परिस्थितीत आमच्या पाठिशी उभे असतात.

प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत तर आई या गृहिणी... मुळशी या तालुक्यात ते लहानाचे मोठे झाले आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते आवर्जून सांगतात.

प्रवीण तरडे यांचे शिक्षण पुण्यात झाले असून रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी नोकरी देखील केली आहे. पण नोकरी करणे आपल्याला जमणारे नाही असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. ते लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत.

करिअरच्या सुरुवातीला प्रविण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचं लेखन केले.

टॅग्स :प्रवीण तरडे