Join us  

दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 8:34 AM

हळद हसू मेहेंदी रचली! प्रथमेश-क्षितीजाची सुरू आहे लगीनघाई, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

सध्या कलाविश्वात सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबच्या घरीही लगीनघाई सुरू आहे. प्रथमेश लवकरच क्षितीजा घोसाळकरसह विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच प्रथमेशचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. 

प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावरुन हळदीचे काही फोटो शेअर केले आहेत. हळदीसाठी प्रथमेशने पांढरा रंगाचा फुलांचे डिजाईन असलेला कुर्ता परिधान केला होता. त्याच्या हळदीली अभिनेता अक्षय केळकरनेही हजेरी लावली होती.इतर मराठी सेलिब्रिटीही त्याच्या हळदीसाठी उपस्थित होते.  मित्रांबरोबर प्रथमेशने हळदी समारंभात धमाल केल्याचं फोटोत दिसून येत आहे. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

एकीकडे प्रथमेशला हळद लागली. तर दुसरीकडे क्षितीजाने प्रथमेशच्या नावाची मेहेंदी हातावर काढली. याचे फोटो तिच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. क्षितीजा आणि प्रथमेश येत्या २४ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. १४ फेब्रुवारीला त्यांनी साखरपुडा केला होता. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. 

टाइमपास मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या दगडूला अखेर त्याची खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाली आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही आनंदी आहेत. दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या डिलिव्हरी बॉय सिनेमात प्रथमेश झळकला होता. 

टॅग्स :प्रथमेश परबसेलिब्रेटी वेडिंगमराठी अभिनेता