Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपल्याचे ललित प्रभाकरला पडले स्वप्न... पाहा हा मजेदार व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 11:03 IST

ललित प्रभाकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देललितचा हा मजेदार व्हिडिओ, त्यातील त्याचा अभिनय, या व्हिडिओतील बँकराऊंडला असलेले गाणे सगळे काही त्याच्या फॅन्सना आवडत असल्याचे ते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सामान्य लोकांसोबत सेलिब्रेटीदेखील आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहेत. काही सेलिब्रेटी तर मजेदार व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या फॅन्सचे मनोरंजन करत आहेत. आता मराठी अभिनेता ललित प्रभाकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याने नुकताच पोस्ट केला असला तरी अनेकांनी तो पाहिला असून हा व्हिडिओ खूपच छान असल्याचे त्याचे फॅन्स त्याला सांगत आहेत. 

ललित प्रभाकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेदार असून त्याच्या चाहत्यांना तो खूपच आवडत आहे. या व्हिडिओत ललित चित्रीकरणासाठी जाण्याची तयारी करताना दिसत आहे. लॉकडाऊन संपले असे त्याला वाटत असल्याने तो खूपच खूश आहे. पण घराच्या बाहेर त्याने पाऊल ठेवायच्या आधी लॉकडाऊन संपला हे केवळ तो स्वप्नात पाहात होता असे त्याच्या लक्षात येते. हा व्हिडिओ अतिशय मजेदार पद्धतीने चित्रीत करण्यात आला असून या व्हिडिओत त्याच्यासोबत दिग्दर्शक प्रतिक पाटील दिसत आहे. त्याच्यासोबत ललितला काम करण्याची असून माझी ही इच्छा स्वप्नात तरी पूर्ण झाली असे त्याने या व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

ललितचा हा मजेदार व्हिडिओ, त्यातील त्याचा अभिनय, या व्हिडिओतील बँकराऊंडला असलेले गाणे सगळे काही त्याच्या फॅन्सना आवडत असल्याचे ते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

टॅग्स :ललित प्रभाकर