मराठी मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत, जे अभिनयासोबत शेतीत रमताना दिसतात. यशस्वी अभिनय कारकीर्द असली तरी आपल्या मातीला अन् शेतीला विसरलेले नाहीत. गेल्या काही काळात कलाकार मंडळी शेती करण्यासाठी पुढे सरसावली. अनेकदा हे कलाकार आपल्या शुटींगमधून वेळ काढून शेतीत रमताना पाहायला मिळतात.
विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिजीत चव्हाण शेतीत काम करतोय. त्यानं इन्स्टाग्रामवर नांगरणी करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये अभिजीत हा शेताची नांगरणी करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने 'मशागत' असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय 'लालबागचाबाबा' असं हॅशटॅगदेखील वापरला आहे.
अभिजीतनं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिजीत चव्हाण हा एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे, जो मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो.अभिजीत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तो सांगत असतो. चाहतेही त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.