Join us

​ हृदयांतर चित्रपटातून मनिषचे मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 15:55 IST

अनेक बॉलिवूड कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली असल्याचेच पाहायला मिळतेय. मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बॉलिवूडमधील सलमान, शाहरुख सोबतच ...

अनेक बॉलिवूड कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली असल्याचेच पाहायला मिळतेय. मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बॉलिवूडमधील सलमान, शाहरुख सोबतच अनेक दिग्गज कलाकारांनी व्यक्त केली आहे. आता अभिनेता आणि होस्ट मनिष पॉल देखील आपल्याला एका आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच बॉलिवूडच्या एस आर के म्हणजेच शाहरूख खानने मुहूर्त केलेल्या विक्रम फडनीस यांच्या हृदयांतर या सिनेमामध्ये हिंदीतील प्रसिद्ध  होस्ट मनिष पॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनिष पॉल या सिनेमातून पहिल्यादांच मराठीत पदार्पण करत आहे. या सिनेमात त्याची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. विक्रम फडनीस प्रॉडक्शन्स आणि यंग बैरी एंटरटेनमेंट प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या हृदयांतर या सिनेमात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे प्रेक्षकांना प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.  विक्रम फडनीस आणि मनिष पॉल खूप पूर्वी पासूनच खूप चांगले मित्र आहेत. विक्रमने मनिषला या सिनेमात काम करशील का विचारलं तेव्हा मनिषने लगेचच त्याचा होकार कळवला. त्याला या सिनेमाची कथा सुद्धा फार आवडली. मी खूप खुश आहे की मला तुज्या पहिल्या सिनेमाचा हिस्सा बनायला मिळालं, असं देखील तो म्हणाला. नुकतच मनिषने हृदयांतरच्या सेटवर लहान मुलांच्या समवेत काही सीन्सचे चित्रीकरण केले आहे. मराठी सिनेमाच्या सेटवर येण्याचा मनिषचा अनुभव खूप वेगळा होता. ह्रदयांतर या चित्रपटाच्या मुहूतार्साठी शाहरुख खानसह प्रताप सरनाईक, अब्बास-मुस्तान, अर्जुन कपूर, सोनाली खरे, मुक्ता बर्वे असे अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. विक्रम फडणीस हे बॉलिवूडमधील खुप मोठे नाव आहे. आता विक्रम मराठी चित्रपट कसा बनवतोय याकडेच सर्वांचे लक्ष लागलले आहे. तर लवकरच आपल्याला मनिषचा मराठमोळा अभिनय मोठ्या पडदयावर पाहायला मिळणार आहे.