मकरंद अनासपुरे परतणार रंगभूमीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 11:21 IST
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता मकरंद अनासपुरे हा आता पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज झाला असल्याचे समजत आहे. ...
मकरंद अनासपुरे परतणार रंगभूमीवर?
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता मकरंद अनासपुरे हा आता पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज झाला असल्याचे समजत आहे. मकरंद हा लवकरच एका नाटकाच्या माध्यमातून खूप वर्षानी रंगभूमीवर परतणार असल्याचे कळत आहे. त्याचे हे नाटक सुयोग नाटयसंस्थेचे असणार आहे. मात्र अदयाप ही त्याच्या या नाटकाचे नाव कळाले नाही. त्याचबरोबर या नाटकात त्याच्यासोबत कोण असणार आहे हेदेखील माहित नाही. मात्र प्रेक्षकांच्या लाडक्या या कलाकाराला रंगभूमीवर पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील खूपच उत्साही आहे. या कलाकाराने यापूर्वी केशवा माधवा, जाउ बाई जोरात, झालं एखदाच, सगळे एका पेक्षा एक असे अनेक नाटक केली आहेत. आता तो पुन्हा प्रेक्षकांना रंगभूमीवर अभिनय करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच हे मोठे सरप्राईज असणार आहे. मकरंदने नेहमीच आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याने अनेक बॉलिवुड चित्रपटदेखील केले आहे. फू बाई फू, गंगूबाई नॉन मॅट्रिक, तिसरा डोळा, शेजार, हप्ता बंद असे अनेक टीव्ही शो केले आहेत. त्याचप्रमाणे त्याने दे धक्का, दोघात तिसरा आता सगळे विसरा, सखाराम, सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव, कायदयाच बोला, शुभमंगल सावधान, गाढवाचं लग्न, नाना मामा, जबरदस्त, जाऊ तिथे खाऊ, साडे माडे ती, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगराएवढी असे अनेक सुपरहीट चित्रपट त्याने मराठी इंडस्टीला दिले आहेत.