Join us  

'थिएटर्स मिळत नाही हे...' महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेमांबाबतीत केलं भाष्य; म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 4:27 PM

ते म्हणाले, 'आज प्रत्येक भाषेत दर्जेदार चित्रपट बनत आहेत.'

मराठी सिनेमांना सध्या चांगले दिवस आले आहेत. 'वेड', 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा' सारख्या सिनेमांनी कमालीचं यश मिळवलं आहे. मात्र हे मोजके चित्रपट सोडले तर अनेक सिनेमांना स्क्रीन्सच मिळत नाहीत अशी बोंब असते. शोज मिळत नाही म्हणून कलाकार, निर्माते त्रस्त असतात. मात्र ही ओरड खोटी असल्याचं भाष्य महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी जागतिक रंगभूमीदिनाला आयोजित एका कार्यक्रमात केलंय.

कार्यक्रमादरम्यान सकाळला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, "मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाहीत ही ओरड खोटी आहे. आपण आपला विचार बदलायला हवा. आज प्रत्येक भाषेत दर्जेदार चित्रपट बनत आहेत. थिएटर मालकांना भाषेशी घेणंदेणं नाही. प्रेक्षकही फक्त स्टार आहे म्हणून सिनेमा बघायला जात नाही तर स्टोरी चांगली असली पाहिजे. साऊथचे डब केलेले सिनेमे चालतात मग मराठी का नाही?"

मराठी सिनेमा आणि थिएटर्सच्या वादावर महेश मांजरेकर यांनी अचूक बोट ठेवलं आहे. सध्या महेश मांजरेकर 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तर नुकतंच ते 'बटरफ्लाय' या मराठी सिनेमात झळकले.

टॅग्स :महेश मांजरेकर मराठी चित्रपटमराठी अभिनेता