Join us

​१२ जूनला येणार 'मधु इथे अन चंद्र तिथे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:29 IST

‘चित्रपंढरी’ बॅनरचा ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर मांडली जाणार आहे. प्रत्येक शहराची स्वत:ची ...

‘चित्रपंढरी’ बॅनरचा ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर मांडली जाणार आहे. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाºया धमाल कथेची मेजवानी म्हणजे ‘मधु इथे अन चंद्र तिथे’ हा सिनेमा होय.धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी हा सिनेमा देणार आहे. या चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर जाऊन तेथे चांगलीच दंगामस्ती या टीमने केली. दमदार स्कीट, विनोदाचा वेगळा अंदाज, हास्याचे फवारे याने हा भाग चांगलाच रंगला. १२ जूनला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.