Join us  

'गॅरी’च्या रिअल पत्नीचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल रिल शनायापेक्षाही लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 8:24 AM

छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी ...

छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी अभिजीतने मोठ्या खुबीने रंगवला आहे. घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांना चांगलीच भावते.रिल लाइफमध्ये ऑनस्क्रीन पत्नी राधिकाशी पटत नसलं तरी रिअल लाइफ पार्टनर म्हणजेच त्याची पत्नी सुखदा खांडकेकर हिच्यावर अभिजीतचं जीवापाड प्रेम आहे.अभिजीत आणि सुखदा यांचे लव्ह मॅरेज झालं हेही रसिकांना माहिती आहे. अभिजीतप्रमाणेच सुखदासुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे विविध मालिका, नाटकांमधून सुखदाचं रसिकांना दर्शन घडत असतं. मात्र सुखदाचा एक हॉट आणि तितक्याच बोल्ड अंदाजातील फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर सुखदाचा हा फोटो व्हायरल होतोय. पूर्णपणे बॅकलेस, कानातील मोठमोठाले झुमके, हातात फूल आणि तितक्याच सुखदाच्या घायाळ करणा-या मादक अदा आणि बोल्ड अंदाज या फोटोमध्ये पाहायला मिळतो आहे. या फोटोत संस्कृती आणि ग्लॅमरचा सुरेख असा मिलाप पाहायला मिळतो आहे. सुखदाचा हा अंदाज रसिकांना आणि तिच्या फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे.Also Read:Glamorous अंदाजात दिसली अभिनेत्री, तर या अभिनेत्याने दिली अशी रिअॅक्शन!नुकतेच एका जाहिरातीसाठी सुखदा खांडकेकरचा Glamorous अंदाज पाहायला मिळाला.यावेळी व्हाईट कलरच्या गाऊन तिने परिधान केला होता.या गाऊनमध्ये तिचे सौदर्य कमालिचे खुलून आल्याचे पाहायला मिळत आहे.व्हाईट कलरच्या गाऊनमध्ये सुखदाचा अंदाज तितकाच घायाळ करणारा आहे.त्यामुळे सुखदाने हे फोटो शेअर करताच तिला तिच्या चाहत्यांकडून खुप सारे कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.तर दुसरीकडे पती अभिजित खांडकेरने देखील  Love U अशी कमेंट देत तिचे खूप कौतुक केले आहे.त्यामुळे सुखदाने फक्त अभिजितलाच नाहीतर इतर चाहत्यांनाही आपल्या लूकने क्लिन बोल्ड केल्याचे पाहायला मिळत आहे.