Join us  

'मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर...', काश्मीरमध्ये उमेश कामतसोबत घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 3:27 PM

Umesh Kamat And Priya Bapat : सध्या उमेश कामत आणि प्रिया बापट दोघे काश्मीरमध्ये फिरायला गेले आहेत आणि तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. प्रिया-उमेश दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि या जोडीचे खूप फॅन फॉलोव्हर्स आहेत. बऱ्याचदा ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टला चाहत्यांची पसंंती देखील मिळताना दिसते. सध्या ते दोघे काश्मीरमध्ये फिरायला गेले आहेत आणि तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

उमेश कामतने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रियासोबतची एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तो बर्फातून चालताना दिसत आहे. तो असे म्हणतोय की, मी इथे निसर्गाचा आनंद लुटत आहे. आरामात चालतो आणि प्रिया त्याच्याबरोबर निघून गेली आहे. बघा छान गप्पा मारत चालली आहे. काश्मीरमध्ये माझ्याबरोबर आलीय एकदा गप्पा मारायला सुरवात केली की थांबत नाही, कसला विचार नाही उमेश मागे राहिलाय….” अशी त्याची प्रतिक्रिया होती.

या व्हिडीओत उमेश असेही म्हणतोय की, त्याच्या घरच्या गोष्टीदेखील जाणून घेत असेल. कदाचित ती इथेच स्थायिक होण्याचा विचार करतेय वाटतं. दोघे जात असताना त्यांच्याबरोबर एक गाईड होता मात्र चालताना प्रिया गप्पा मारत मारत त्या गाईडबरोबर पुढे गेली आणि उमेश मागेच राहिला.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी २०११मध्ये लग्न केले. लग्नाआधी ते एकमेकांना डेट करत होते. दोघेही गेली अनेक वर्ष नाटक, मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.  

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत