Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेचं संपूर्ण कुटुंब आहे कलाविश्वात सक्रीय; पाहा फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 10:42 AM

Laxmikant berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलं असेल. प्रिया बेर्डेदेखील उत्तम अभिनेत्री आहेत. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर त्या हॉटेल व्यावसायिकदेखील आहेत.

मराठी कलासृष्टी समृद्ध करणारा दिग्गज दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) कांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचं निधन होऊन आज बराच काळ लोटला. मात्र, त्याच्या आठवणी त्याच्या उत्तम अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. म्हणूनच, आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणताही चित्रपट लागला की प्रेक्षक आवर्जुन तो पाहतात. प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच आज त्यांच्या चौकटी कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलं असेल. प्रिया बेर्डेदेखील उत्तम अभिनेत्री आहेत. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर त्या हॉटेल व्यावसायिकदेखील आहेत. विशेष म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलांनी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी अभिनय (abhinay berde) आणि स्वानंदी (swanandi berde) ही दोन मुलं असून दोघेजण कलाविश्वात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. तर, लेक स्वानंदी ही सध्या कलाविश्वात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. स्वानंदीने 'धनंजय माने इथंच राहतात..' या नाटकातून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. 

दरम्यान, स्वानंदी सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. सध्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रिया बेर्डे, अभिनय आणि स्वानंदी दिसून येत आहेत. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत असतानाच अनेकांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डेअभिनय बेर्डेसेलिब्रिटीसिनेमा