Join us

कलर्स पिंकेथॉनच्या पाचव्या आवृत्तीचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 15:54 IST

युनायटेड सिस्टर्स फाऊंडेशन आणि मॅक्झिमस इव्हेंटस तंदुरूस्तीचे चाहते त्याचबरोबर अनवाणी पायांनी धावणारे धावपटू आणि पिंकेथॉनचा संस्थापक अभिनेते मिलिदं सोमण ...

युनायटेड सिस्टर्स फाऊंडेशन आणि मॅक्झिमस इव्हेंटस तंदुरूस्तीचे चाहते त्याचबरोबर अनवाणी पायांनी धावणारे धावपटू आणि पिंकेथॉनचा संस्थापक अभिनेते मिलिदं सोमण यांनी  मुंबईतील पाचव्या आवृत्तीच्या शर्यतीची घोषणा केली आहे. या उपक्रमातून महिलांच्या कुशलतेचा संदेश सगळीकडे पोचविण्यात येणार आहे. इन्सापयरिंग पार्टनर बजाज इलेक्ट्रिकल्स असलेल्या कलर्सच्या पिंकेथॉनच्या मुंबईतील पाचव्या आवृत्तीच्या शुभारंभा प्रसंगी आनंद व्यक्त करताना, मिलिदं सोमण सांगतात, आम्ही कलर्सची पिंकेथॉन पुन्हा एकदा मुंबईत आणण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. आम्हाला विश्वास आहे की हे शहर आणि त्यातील लोक आम्हाला पाठिंबा देतीलच आणि ही शर्यत यशस्वी करून दाखवतील. कलर्सची पिंकेथॉन ही मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे. हे बदलाचे बीज आहे आणि एका चळवळीची सुरूवात आहे, जी संपूर्ण भारतातील सक्षम महिलांकडून चालविली जात आहे आणि त्यांचा विश्वास आहे की सक्षम महिलेमुळे निरोगी कुटुंबाची, निरोगी देशाची आणि निरोगी जगाची सुरूवात होते. मुख्य दिवसाचा अग्रदूत म्हणून, टीम कॅन्सर शेरो ट्रेक सारखे विशेष उपक्रम आयोजित करणार आहे. शेरो हा कॅन्सरमधून वाचलेला आहे आणि हा उपक्रम अशा प्रेरणादायी लोकांना अर्पण केला जाणार आहे. या ट्रेकला सुरूवात करताना, या उपक्रमामध्ये कर्क रोगातून वाचलेल्या व्यक्तींचा आय इन्स्पायर पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. कलर्सच्या पिंकेथॉन मध्ये वेगवेगळया प्रकारातील शर्यतीत १०० अपंग मुली आणि ५० मूकबधिर मुली सहभागी होणार आहेत. मुख्य दिवसासाठी त्यांना तयार करण्यासाठी, एक विशेष प्रशिक्षण शिबीर त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे जे नामवंत धावपटूंच्या मदतीने तयार केलेले आहे.