Join us

लॅन्डमार्क फिल्मसचे पारडे पुन्हा वजनदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:11 IST

असिस्टंट डायरेक्टर ते डायरेक्टर आणि डायरेक्टर ते निमार्ती अशी चढती कमान असणाºया लॅन्डमार्क फिल्मसच्या विधि कासलीवाल. २००६ मध्ये विवाह ...

असिस्टंट डायरेक्टर ते डायरेक्टर आणि डायरेक्टर ते निमार्ती अशी चढती कमान असणाºया लॅन्डमार्क फिल्मसच्या विधि कासलीवाल. २००६ मध्ये विवाह या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरचे काम करणाºया विधि कासलीवाल यांनी २०१० मध्ये इसी लाइफ में या हिंदी चित्रपटाची कथा लिहून त्याचे दिग्दर्शनही केले होते. दिग्दर्शनानंतर सिनेसृष्टीतले अजून एक माध्यम पारखून बघण्याच्या उद्देश्याने त्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या निर्मितीतल्या पदार्पणासाठी त्यांनी सांगतो ऐका! या मराठी चित्रपटाची निवड केली. आणि आता वजनदार या आगामी चित्रपटामुळे लॅन्डमार्क फिल्मस्चे पारडे पुन्हा जड झाले आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या वजनदार चित्रपटाची कथा लिहिली आहे. याविषयी बोलताना निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, सचिनच्या डोक्यातली ही वजनदार कल्पना मला खूपच भावली. प्रत्येकाला अगदी सहज आपलीशी वाटेल अशी ही कथा होती. त्याचे कथेत रूपांतर करण्याचा कालावधी मजेदार होता.पुढे सचिनबद्दल बोलताना ते तीक्ष्ण बुध्दीमत्तेचे भावूक दिग्दर्शक असल्याची सतत जाणीव होते. कथेसंदभार्तील इतरांची मते ते खुल्या मनाने स्वीकारून त्या मतांना आदर देऊन त्यांना खूप सुंदररित्या चित्रपटात दाखवत असल्याचे ही त्या म्हणाल्या. चित्रपटाच्या चित्रिकरणापासून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चचेर्चा विषय ठरला आहे. याला कारण म्हणजे आघाडीच्या दोन अभिनेत्री यात प्रमुख भूमिकेत आहेत. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघी या वजनदार चित्रपट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याबरोबरच सिध्दार्थ चांदेकर, चिराग पाटील आणि चेतन चिटणीस हे अभिनेते ही या चित्रपटात दिसणार आहेत.