लेकीचं आईवरील असंही प्रेम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:47 IST
ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना नुकताच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणा-या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित ...
लेकीचं आईवरील असंही प्रेम !
ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना नुकताच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणा-या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. नाट्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात 51 हजार रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. ज्योती चांदेकर यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाचा जीवनगौरवर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. ज्योती चांदेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांसह त्यांची लेक आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिलासुद्धा आपल्या आईच्या या पुरस्काराचं अप्रूप वाटत आहे. आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि या पुरस्काराबद्दलचं कौतुक करण्यासाठी तेजस्विनीनं सोशल मीडियाचा आधार घेतलाय. मानपत्र आणि सन्मानचिन्हासह ज्योती चांदेकर यांचा फोटो तेजस्विनीने ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर तेजस्विनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. आपल्या आईचं अभिनंदन करताना तेजस्विनीने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. "प्रसिद्धीचा झोत असो किंवा नसो 47 वर्षे रंगभूमीची निष्ठेने सेवा करणा-या ज्योती चांदेकर सारख्या गुणवंत कलाकाराची मुलगी असल्याचा अभिमान आहे' अशा शब्दांत तेजस्विनीने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.