Join us

मृण्मयी गोडबोलेने घेतले कुंग फू चे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 11:20 IST

बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्टस् च प्रशिक्षण घेतात हे आपणा सर्वाना माहितीच आहे, पण आता ...

बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्टस् च प्रशिक्षण घेतात हे आपणा सर्वाना माहितीच आहे, पण आता मराठी कलाकार देखील मागे नाही आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि या मराठी अभिनेत्रीने चक्क कुंग फू चे धडे घेतले आहेत. चि. व चि.सौ.कां. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिने या चित्रपटासाठी कुंग फू च प्रशिक्षण घेतलं. चि. व चि.सौ.कां. या चित्रपटातून प्रेक्षक मृण्मयीला मोठ्या पडद्यावर कुंग फू करताना पाहू शकतील.मृण्मयी तिच्या कुंग फू प्रशिक्षणाबद्दल सांगते,मी या आधी कलरीपयट्टू शिकली आहे आणि १० वर्ष मी बास्केटबॉल सुद्धा खेळली आहे. (राष्ट्रीय पातळीवरही खेळली आहे) पण मी या आधी कुंग फू कधीच शिकली नव्हती. चित्रपटाच्या शूटिंगच्या १ महिना आधी मला आणि ललितला कुंग फू च प्रशिक्षण देण्यात आलं. मी चित्रपटात कुंग फू ब्लू बेल्ट असलेल्या मुलीचं पात्र साकारलंय. जरी मी ट्रेनिंग सेशन्स उशिरा चालू केले तरी मी खूप मेहनत आणि प्रॅक्टिस करून कुंग फू शिकली आणि त्यात मला माझ्या कलरीपयट्टू आणि बास्केटबॉल ट्रेनिंगची खूप मदत झाली. आमचे ट्रेनर श्रीकांत सर यांनी खूप सक्त ट्रेनिंग देऊन आमच्याकडून कठीण व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतले. मला असं वाटतंय मी एका महिन्यात वर्षभराचं कुंग फू शिकलेय. कुंग फू शिकण्याची प्रक्रिया खूप कडक आणि थकवणारी होती, पण त्याची चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्हाला खूप मदत झाली. मला आणि ललितला दुखापत ही झाली आणि आम्ही एकमेकांना मारलं देखील पण ते जाणीवपूर्वक नव्हतं, तो चित्रीकरणाचा भाग होता.