Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची लेक आहे मोठ्या चॅनलची हेड, पतीही होते दिग्गज अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 8:00 AM

नीना कुलकर्णी हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव. आजवर अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपटांत त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

ठळक मुद्देदिलीप कुलकर्णी आज या जगात नाहीत.  2002 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर नीना कुलकर्णी यांनी आपले करिअर सांभाळत  दोन मुलांचा सांभाळ देखील केला.

नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव. आजवर अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपटांत त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका आठवली तरी नीना कुलकर्णींचा चेहरा समोर येतो. ही त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती म्हणायला हवी. आज आम्ही नीना यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

नीना कुलकर्णी या एक दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांना सर्वच ओळखतात. त्यांचे पती हेही मोठे अभिनेते होते. दिलीप कुलकर्णी असे त्यांचे नाव. दिलीप कुलकर्णी यांनी सर्वसाक्षी, विनायक, आई, चौकट राजा या सारख्या चित्रपटात काम केले होते. त्याच प्रमाणे रात्र आरंभ यातही त्यांनी काम केले होते. दिलीप कुलकर्णी यांची ‘चौकट राजा’ या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर हे मुख्य भूमिकेत होते.

 दिलीप कुलकर्णी आज या जगात नाहीत.  2002 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर नीना कुलकर्णी यांनी आपले करिअर सांभाळत  दोन मुलांचा सांभाळ देखील केला.  नीना कुलकर्णी यांना दोन मुलं आहेत. एका मुलीचे नाव सोहा असे आहे. तर मुलाचे नाव दिवीज असे आहे. 

मुलगी सोहा ही सोनी मराठीवर क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करते. सोशल मीडियावर सोहा प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आईसोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते. नीना यांचा मुलगा दीवेश हा क्रिकेटपटू व फोटोग्राफर आहे. दोघेही आपल्या क्षेत्रामध्ये प्रचंड यशस्वी आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजन