Join us  

Shocking : केतकी चितळेचा निर्मात्यांवर धक्कादायक आरोप, आजारामुळे दाखवला मालिकेतून बाहेरचा रस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:50 AM

केतकी चितळे हिला अलीकडे या मालिकेतून डच्चू देण्यात आला. केतकीला या मालिकेतून काढण्यामागचे कारण आत्तापर्यंत गुलदस्त्यात होते.

ठळक मुद्दे खुद्द केतकीने सोशल मीडियावर याबाबतचा एक धक्कादायक खुलासा केला आहे

केतकी चितळे हिला अलीकडे या मालिकेतून डच्चू देण्यात आला. केतकीला या मालिकेतून काढण्यामागचे कारण आत्तापर्यंत गुलदस्त्यात होते. पण आता खुद्द केतकीने सोशल मीडियावर याबाबतचा एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय,'या आजारामुळे निर्मात्यांनी केतकीला या मालिकेतून बाहेर केले.'

epilepsy म्हणजे अपस्मार. फिट येणे, आकडी, मिरगी आदी नावांनी हा आजार ओळखला जातो. अपस्मार या आजारात रूग्णाला कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक झटका येतो. हा एक मेंदूशी निगडीत आजार आहे. याच आजारामुळे ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’चे निर्माते संगीता सारंग आणि राकेश सारंग यांनी आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला, असा तिचा आरोप आहे. तसेच त्याच्या भूमिकेला TRP नसल्याचे कारण देत तिच्या ऐवजी अचानक दुसऱ्या अभिनेत्रीला मालिकेमध्ये आणण्यात आले आणि तेही मला आत्ताच कळले. माझ्या आजारामुळे मला या शोमधून बाहेर काढले गेले. मी याविरोधात आवाज उठवला कारण, हा माझ्या एकटीवरचा अन्याय नाही तर माझ्यासारख्या या आजारामुळे ग्रस्त असलेल्यांवरचा अन्याय आहे, असे केतकीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

मालिकेच्या नुकत्याच शूट झालेल्या रंगपंचमीच्या सिक्वेन्समध्ये आम्हाला ‘परफ्युम्ड सेन्टेड कलर्स’ वापरायला दिले. यामुळे माझ्या अंगाला खाज सुटली. सेटवरचे वातावरण अपमानास्पद होते, अशा सगळ्या तक्रारींचा पाढाही याव्हिडीओत तिने वाचला आहे. केतकीने, यासंदर्भात फेसबुकवरून आवाज उठवला असून यासंदर्भात एक खुले पत्रही लिहिले आहे.

टॅग्स :केतकी चितळे