Join us  

'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही', ख्रिसमस साजरा केल्यामुळे केतकी माटेगाकर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 4:23 PM

केतकीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

केतकी माटेगावकर ही लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर आवाजाने केतकी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिने गायलेली अनेक गाणी हिटही ठरली आहेत. केतकी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. पण, ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. नाताळच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केल्यामुळे केतकीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

केतकीने ख्रिसमस साजरा केल्यानंतर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. यामध्ये केतकीने लाल रंगाची सांताक्लॉजची टोपी घातली आहे. यावेली केतकी चेक्स क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये दिसली.  तर बाजूला ख्रिसमस ट्री दिसत आहे. केतकीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Too much of holiday fever!' असे लिहिले.  या फोटोंवरून तिला ट्रोल केले जात आहे.

केतकीच्या पोस्टवर एका युजरने लिहले, 'आज गीता जयंती आणि तुळशी पूजन दिवस पण आहे'. तर आणखी एका युजरने म्हटले, 'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही'. तर एकाने कमेंट केली, 'केतकी हे बरोबर नाही ग.... आपली संस्कृती काय आपले कुळ. आपली परंपरा हे भारतीय आहे'. एका युजरने  संस्कृतीचे धडे देत लिहले, 'मराठी माणूसच मराठी संस्कृतीची अस्मिता जपायला तयार नाहीए. केतकीच नाही बाकीही मराठी celebrities च्या posts पाहून दिसतंय'. 

यापुर्वीही केतकीला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं होतं. यावर मात्र सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत तिने ट्रोल करणाऱ्यांना आणि बॉडी शेम करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. २०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अलीकडच्या काळात केतकी अभिनय क्षेत्रासह अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी तिने मुंबईतील प्रदूषण समस्ये संदर्भात  एक पोस्ट शेअर करत केली होती. यामध्ये मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं होतं.

टॅग्स :केतकी माटेगावकरसेलिब्रिटीमराठी अभिनेतानाताळ